कॉंग्रेस तालुका उपाध्यक्षांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे ,जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली  काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अॅड. राहुल पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 

अॅड. राहुल पाटील व त्यांच्या समर्थकांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रुमाल टाकून आ .एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे खेवलकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. याप्रसंगी राहुल पाटील यांच्यासह शेख वसीम शेख रहीम, योगेश नामयते, योगेश पाटील, युवराज सावळे, दिलीप सावळे, अश्विन बोदडे, प्रविण सावळे, गणेश सोनवणे, राहुल नामयते,नकुल सावळे, गजानन धनगर, संकेत पाटील, गणेश धनगर यांनी आणि अल्पसंख्यांक समाजातील जुबेर अली यांचे समर्थक इस्माईल मणियार, समशेर खान मुक्तार खान,शेबाद अली गफ्फार अली, शोएब शेख शब्बीर, आसिफ पटेल, इकबाल पटेल, सिद्धीक शाह शब्बीर शाह, शे. अरबाज रईस, शाहरुख नसीर शाह, साबीर खा झाकीर खा  यांनीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

अॅड.राहुल पाटील यांनी २०१९ मध्ये वंचित बहुजन विकास आघाडी च्या तिकिटावर मुक्ताईनगर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना ९७५१ मतदान मिळाले होते त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सध्या ते मुक्ताईनगर तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. ते पेशाने वकील आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील  तरुण वर्गात त्यांचे कार्यकर्त्यांचा  गोतावळा आहे.  आगामी काळात त्यांच्या माध्यमातून अनेक तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असे राहुल पाटील यांनी सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना रोहिणी खडसे म्हणाल्या, देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पुरोगामी विचारसरणीवर चालणारा व सर्व जाती धर्माला न्याय देणारा लोकशाहीच्या मार्गावर चालणारा शिव-शाहू-फुले- गांधी- आंबेडकर यांचे तत्वज्ञान व विचारधारा मानणारा पक्ष आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तरुण वर्गाला नेतृत्वाची संधी देणारा पक्ष आहे.  आगामी काळात आणखी तरुण वर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजु माळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू सापधरे, माजी सरपंच प्रविण पाटील, बापु ससाणे, बाळा भालशंकर, सोपान दुट्टे, सोनु पाटील, रउफ खान, दिपक साळुंखे, एजाज खान, विशाल रोटे, निलेश भालेराव, चेतन राजपूत, अजय महाराज तळेले आणि पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content