पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपा ने निवडणूकीत शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते त्याची आठवण करून देण्यासाठी कॉग्रेस ने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, सोयाबीन, कापूस, तुर, व हरभरा, या पिकांची शासनाने त्वरित खरेदी करावी, खुल्या बाजारात कमी किमतीत विकलेल्या सोयाबीन, कापूस, तूर हरभरा या पिकांना भावांतर योजना जाहीर करावी, शेतकऱ्यांना लागणारे खते बियाणे कीटकनाशक व अवजारे यांना जीएसटी मुक्त करावे, पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी इतर आणि शहरातील वीज ग्राहकांना वीज मंडळाने जे स्मार्ट मीटर बळजबरीने बसवणे सुरू केले आहे ते मीटर बसवणे त्वरित बंद करावे अशा प्रमुख मागण्या घेऊन एक दिवशीय धरणे आंदोलन कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. यावेळी भाजप सरकार ला आठवण देण्यासाठी च्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी नायब तहसीलदार विनोद कुमावत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार, तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, प्रदेश प्रतिनिधि शेख ईस्माइल शेख फकिरा, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा सचिव राजेंद्र महाजन, इरफान मनियार, युवक प्रदेश सरचिटणीस आशुतोष पवार, मनोहर महाले, महीला सरचिटणीस कुसुम पाटील, शरीफ शेख, शंकर सोनवणे, उबाठाचे अरुण पाटील, अॅड. के. एस. पाटील, आंनद अहीरे, नवल भोई, युवक काँग्रेस अध्यक्ष कल्पेश येवले, सुनील पाटील, मुबारक शेख, प्रकाश भिवसने, साहेबराव पाटील, दशरथ पाटील, रामसिंग जाधव, रविंद राठोड, चेतन बोदवडे आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.