जळगाव (प्रतिनिधी) । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे येथे 1 मार्च रोजी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ हे धुळे येथूनच करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या महिला प्रभारी प्रदेशाध्यक्ष हेमलता पाटील यांनी नियोजन बैठकीत दिली.
कॉग्रेसची ही पहिली प्रचार सभा असून सभा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दहा ते बारा वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘मोदी तेरी पोल खुलेंगी धुलिया के मैदान में’ हा नारा देत धुळ्यातील प्रचार सभेस सुरूवात करण्यात येणार आहे. या सभेसाठी कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, प्रभारी प्रदेशाध्यक्ष हेमलता पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, डॉ. ए.जी.भंगाळे, डॉ. राधेश्याम चौधरी, डी.जी. पाटील यांनी केले आहे.