Home Cities यावल फैजपूर येथे आज काँग्रेस पक्षाची आढावा बैठक

फैजपूर येथे आज काँग्रेस पक्षाची आढावा बैठक


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फैजपूर येथे एक अत्यंत महत्वाची आढावा बैठक आज, दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक धनाजी नाना महाविद्यालयाजवळील डी.एन. कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये होणार आहे. या बैठकीसाठी रावेर तालुका व शहर, यावल तालुका व शहर तसेच फैजपूर शहरातील काँग्रेस पक्षाचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, फ्रंटल व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांच्या सूचनेनुसार श्याम उमाळकर हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे अध्यक्षस्थान माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी भूषविणार असून, माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी देखील यावेळी विशेष उपस्थित राहणार आहेत. या आढावा बैठकीच्या माध्यमातून पक्षाचे संघटन, आगामी निवडणुकांसंदर्भातील रणनीती, स्थानिक प्रश्नांची चर्चा तसेच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.

या बैठकीसाठी प्रभाकर अप्पा सोनवणे (अध्यक्ष, यावल तालुका काँग्रेस कमिटी), डॉ. राजेंद्र पाटील (अध्यक्ष, रावेर तालुका काँग्रेस कमिटी), कदीर खान (अध्यक्ष, यावल शहर काँग्रेस कमिटी), रियाज शेख (अध्यक्ष, फैजपूर शहर काँग्रेस कमिटी) आणि धनंजय चौधरी (प्रदेश सचिव, NSUI) यांनी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

ठिकाण: डी.एन. कॉलेज, फैजपूर (कॉन्फरन्स हॉल)
वेळ: आज सायं. ४.३० वा.
दिनांक: १३ एप्रिल २०२५


Protected Content

Play sound