चोपडा प्रतिनिधी । तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वर्गीय माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त येथील गांधी चौकात कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून पुतळ्याला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड.संदीप पाटील यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, या कार्यक्रमाप्रसंगी प्रा.संदीप पाटील म्हणाले की, महात्मा गांधी ही केवळ व्यक्ती नसून विश्वमान्य विचार आहेत. महापुरुषांच्या मूर्तीची नव्हे तर, त्यांच्या पासून प्रेरणा घेवून आपल्या विचारांची उंची वाढवण्याची गरज आहे. लालबहादूर शास्त्री हे भारताचे शक्तिशाली नेत्यांपैकी एक असून, त्यांनी भारताचा आत्मसन्मान व पुरुषार्थ वृद्धिंगत करणारे जवान व किसान यांच्या संदर्भातील महत्वपूर्ण कार्य देश कदापि विसरणार नाही, असे सांगून उभय महापुरुषांच्या जीवन कार्याचा उपस्थितांना परिचय त्यांनी करून दिला. तत्पूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चोपडा शहरातील गांधी चौकातील अर्धकृती पुतळ्याला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड.संदीप पाटील, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष के.डी.चौधरी, शहर उपाध्यक्ष सय्यद शेख, युवक काँग्रेस अध्यक्ष किरण पाटील, किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जी.प.जळगाव आरोग्य सभापती दिलीप पाटील, माजी उपनगराध्यक्ष न.प.सुप्रिया सनेर, माजी उपनगराध्यक्ष न.प.सुरेखा माळी, मार्केट कमिटीचे माजी सभापती व मजरे हिंगोणे सरपंच नंदकिशोर सांगोरे, सूतगिरणी संचालक राजेंद्र पाटील, चो.सा.का.संचालक गोपाल धनगर, मासुम तडवी, मधुकर पाटील, विनायक पाटील, मोहन पाटील, अँड.एस.डी.पाटील, अँड.विशाल पाटील, प्रा.कांतीलासनेर, धनंजय पाटील, रमाकांत सोनवणे, शाम टेलर, अनिल पाटील, देवकांत चौधरी आदींसह मोठया संख्येने गांधीवादी बंधू भगिंनी उपस्थित होत्या.