काँग्रेस खासदार शशी थरुर यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

shashi tharoor

तिरूवनंतपुरम वृत्तसंस्था । काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी आपल्या पुस्तकातून महिलांचा अवमान केल्याप्रकरणी केरळमधील स्थानिक न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. ‘द ग्रेट इंडियन नॉवेल’ या पुस्तकावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या पुस्तकातून महिलांचा अपमान केल्याचा आरोप शशी थरुर यांच्यावर होत आहे. याप्रकरणी शनिवारी पहिल्यांदा न्यायालयात सुनावणी झाली. शशी थरुर यांना समन्स जारी करण्यात आलं होतं. तरीही शशी थरुर किंवा त्यांच्यावतीने कुणीही वकील न्यायालयात हजर नव्हते. त्यामुळे न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर शशी थरुर यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं की, काही दिवसांपूर्वी न्यायालयाने शशी थरुर समन्स जारी केलं होतं. समन्ममध्ये वेळ लिहिण्यात आली होती, मात्र तारीख लिहिलेली नव्हती.

Protected Content