Home राजकीय काँग्रेसवाले माझ्या हत्येचे स्वप्न पाहत आहेत- पंतप्रधान

काँग्रेसवाले माझ्या हत्येचे स्वप्न पाहत आहेत- पंतप्रधान

0
35

अयोध्या वृत्तसंस्था । काँग्रेसवाले माझ्या हत्येचे स्वप्न पाहत असल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. ते येथे आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.

अयोध्या येथील सभेत मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, दिग्गीराजाने झाकीर नाईकना खांद्यावर उचलून नृत्य केले. काँग्रेस सरकारने त्यांना दहशतवादाबाबत पोलीस अधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले. नाईकना शांततादूत ठरविण्याचे प्रयत्न आधीच्या सरकारांनी केले, असा आरोप पंतप्रधानांनी केला. विरोधी पक्षांतील अनेकांना पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र त्यापैकी कोणाचीही विरोधी पक्षनेताही बनण्याची क्षमता नव्हती. एका कुटुंबाची ५५ वर्षांची सत्ता विरुद्ध चहावाल्याची ५५ महिन्यांची सत्ता यातील योग्य काय आहे, हे नीट पारखून एकाची निवड करा, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, काँग्रेसवाले माझा इतका द्वेष करतात, की ते माझ्या हत्येचे स्वप्न पाहताहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound