काँग्रेसचे शिवकुमार पोलिसांच्या ताब्यात

shivakumar

मुंबई प्रतिनिधी । येथील पवईमध्ये असलेल्या रेनेसन्स हॉटेलमध्ये काँग्रेस-जनता दलाचे (एस)बंडखोर आमदार थांबले आहेत. मात्र या हॉटेलबाहेर हायव्होल्टेजमध्ये ड्रामा सुरु असल्याचे कळताच काँग्रसचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ नेते डीके शिवकुमार येथे पोहोचले परंतू त्यांना पोलिसांनी आत न जाऊ दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.

बंडखोर आमदारांसोबत चर्चा करण्यासाठी डीके शिवकुमार आज सकाळी मुंबईत दाखल झाले असून त्यांना भेटण्यास या आमदारांनी नकार दिला आहे. तसेच, या आमदारांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा मागविली आहे. त्यामुळे पोलिसांकडून डीके शिवकुमार यांना हॉटेलमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली. तरीही सकाळपासून बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यामुळे डीके शिवकुमार यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि नसीम खान यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, हॉटेल परिसरात संचारबंदी लागू केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र या बंडखोर आमदारांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत सुरक्षेतेची मागणी केली आहे. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि वरिष्ठ काँग्रेसचे नेते डीके शिवकुमार यांना भेटणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे 13 महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जनता दल (एस)च्या आमदारांनी राजीनामे देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Protected Content