मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी कॉंग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
आगामी २० जून रोजी होणार्या निवडणुकीसाठीच्या हालचाली आता गतीमान झाल्या आहेत. भाजपने आधीच पाच उमेदवार जाहीर करून बाजी मारली आहे. यानंतर कॉंग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हंडोरे हे माजी मंत्री असून भाई जगताप हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. यामुळे पक्षाने ज्येष्ठांना पुन्हा संधी दिल्याचे दिसून येत आहे.
कॉंग्रेसतर्फे अनेक नावे चर्चेत होती. विशेष करून पक्षाचे डॅशींग प्रवक्ते सचिन सावंत यांना विधानपरिषदेवर पाठविण्यात येईल अशी चर्चा होती. त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त कोट्यात नामनिर्देशीत करण्यात आले असले तरी ही यादी प्रलंबीत असल्याने त्यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र पक्षाने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना पसंती दिली आहे.