पारोळा (प्रतिनिधी) आज लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ पारोळा शहरात जेष्ठनेते माजी खासदार मोरे काका व आमदार डॉ. सतिष पाटील यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार व सवांद रॅलीस मतदारांच्या उत्सुर्द प्रतिसाद मिळाला. भाजपाच्या खोटया भूल थापांना बळी न पडता जळगाव लोकसभा मतदार संघातील सिंचन , चांगले रस्ते , रोजगारासाठी उद्योग व्यवसायासह इतर विविध विकास कामांना चालना देण्यासाठी परिवर्तनाची साद घालत कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस व रिपाईसह मित्र पक्ष आघाडीस आपल्या शहर व तालुक्यातून प्रचंड मतधिक्ये द्या , असे आवाहन आज पारोळा शहरातील प्रचार व सवांद रॅलीद्वारे मतदारांना केले.
प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्ती निमित्ताने त्यांच्या पुतळयास माल्यार्पण करत वंदन केले. यानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरास सदिच्छा भेट दिली. यानंतर प्रचारा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करत वंदन केले. हि प्रचार रॅली ढोल ताश्यांच्या गजरात मुख्य बाजारपेठ भागासह विविध उपनगरातून काढण्यात आली. अनेक ठिकाणी व्यापारी , व्यवसाईक बांधवांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्यात. या प्रचार रॅलीत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यध्यक्ष विलास पाटील, जि.प. सदस्य रोहन पाटील, हिंम्मत पाटील , पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मनोराज पाटील, डॉ. शांताराम पाटील, राजेंद्र देसले, तालुकाध्यक्ष बाळू नाना पाटील, बाजार समितीचे संचालक पराग मोरे, नगरसेवक रोहन मोरे, डॉ. सुरेश पाटील , माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, डिंगबर पाटील, संजय बागडे , मनोहर पाटील , राजेश पाटील , मनोज पाटील , प्रमोद पाटील , गणेश पाटील , दिलीप पाटील , हेमराज पाटील , महिला पदाधिकारी माधुरी ताई पाटील , सुवर्णा पाटील , सुनंदा शेंडे , अन्नपूर्णा पाटील यांच्या सह कॉग्रेस , राष्ट्रवादी कॉग्रेस , रिपाई मित्र पक्ष आघाडीचे सर्वच पदाधिकारी , कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते .