स्व. जे. टी. महाजन यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन

फैजपूर प्रतिनिधी । येथील जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षण महर्षी स्वर्गीय दादासाहेब जेटी महाजन माजी गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना 97 व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.

सर्वप्रथम सकाळी जेटी महाजन यांच्या निवासस्थानी तंत्र वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन व माजी आरती महाजन यांनी दादासाहेबांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण केला. प्रसंगी गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत सभागृहात सरपंच भारती चौधरी, उपसरपंच उमेश बेंडाळे यांनी दादा साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. दूध उत्पादक सहकारी संस्थेत चेअरमन नितीन चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. जे टी महाजन सोसायटीच्या आवारात असलेल्या दादासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याला पी.डी. भारंबे यांच्या हस्ते आणि सभागृहातील प्रतिमेला ज्ञानदेव चोपडे व सागर चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

जे टी महाजन इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या आवारातील पूर्णाकृती पुतळ्याला ना. गुलाबराव पाटील, आ. गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, आ. संजय सावकारे, ना. रंजनाताई पाटील, माजी आ अरुण पाटील, संस्थेचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, मार्तंड भिरुड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच म सा का व्हाईस चेअरमन भागवत पाटील, मानद सचिव विजय झोपे, विष्णू बोरोले, रामा पाचपांडे, प्रभाकर सरोदे, विजय परदेशी, शशिकांत चौधरी, भरत चौधरी, प्राचार्य व्ही आर पाटील, प्राचार्य आर एल चौधरी यांनी आदरांजली अर्पण केली.

या प्रसंगी इंजीनियरिंग कॉलेज चे प्रभारी प्राचार्य डॉ एन डी नारखेडे, पॉलिटेक्निक चे प्रभारी प्राचार्य प्रा. प्रदीप राणे, इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य मोझेस जाधव, सेमी इंग्लिश स्कूलचे प्राचार्य नंदकिशोर सोनवणे, आयटीआयचे प्राचार्य प्रवीण फालक तसेच सर्व विभाग प्रमुख डॉ ए एम पाटील, डॉ डी ए वारके, डॉ के एस भगत, अकॅडमिक डीन डॉ पी एम महाजन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते .

 

Protected Content