पाचोरा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

पाचोरा, प्रतिनिधी । किरणप्रभाजी म.सा. यांच्या द्वितीय पुण्य स्मृती दिनानिमित्त ३० ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत कॉम्प्यूटराईज नेत्र तपासणी व ऑपरेशन पुर्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जयकिरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्था, जयकिरण हाईट्स येथे सदर चे शिबिर होणार आहे.

जयकिरण प्रभाजी नागरी सहकारी पतसंस्था, पाचोरा व नेत्रम हॉस्पीटल, जळगांव यांचे संयुक्त विद्यमाने किरणप्रभाजी म. सा. यांचे द्वितीय पुण्यस्मृती दिनानिमित्त आयोजित शिबिरात मोतीबिंदू (कॅटेरॅक्ट) ऑपरेशन फाको व फोल्डेबल लेन्स, रेटीना डायबिटीस, ब्लडप्रेशर आजारांमध्ये मागच्या पडद्याची संपूर्ण तपासणी व उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत, तिरडेपणा शिबिर आॅपरेशन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत, डोळ्यावरील साय ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात येणार आहे. ऑपरेशनसाठी शहरातील स्व. अॅड. सुभाषचंद स्वरुपचंद संघवी जैन स्थानक, यशोदा नगर, पाचोरा येथे राजेश जैन व मनोज पाटील यांचेकडे नाव नोंदणी करावी लागणार आहे. सदर शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!