चोपडा, प्रतिनिधी | येथील विवेकानंद विद्यालयात दि.१ जानेवारी रोजी दुपारी ४.३० वाजता दरवर्षाप्रमाणे संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘शिक्षण चिंतन परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख वक्त्या श्रीमती शुभदा जोशी विश्वस्त ‘पालकनीती’ व संचालिका ‘खेळघर’ पुणे ह्या ‘संवादी पालकत्व’ या विषयावर मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन विद्यालयाचे सर्व पधाधिकारी, संचालक व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.