रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णाचे हाल होत आहे. रावेर येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या पेशंटवर डॉक्टर मोबाईल वरुन उपचार करत असल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण रुग्णालयात कितीही सिरीयश पेशंट आला तरी डॉक्टर रूमवर असल्याने उपचार घेण्यासाठी येणाऱ्या पेशंटवर नर्स स्वता:ला डॉक्टर समजुन इलाज करत आहे. रावेर येथे ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाच्या जिवाशी येथीलच डॉक्टर खेळत आहे.
ग्रामीण रुग्णालयात रावेर शहरासह तालुकाभरातून उपचार घेण्यासाठी महिला-पुरुष पेशंट येतात. परंतु येथील वैद्यकीय अधिकारी स्वप्नील कडसकर यांचे ग्रामीण रुग्णालयाकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. सध्या उन्हाळा सूरु आहे. अनेक पेशंट उष्मघात, डायरिया या सारखे गंभीर आजाराची लक्षणे असणारे येतात.त्यांचे डॉक्टरांकडून उपचार घेणे अपेक्षित आहे. परंतु दिवसा-रात्री डॉक्टर रूम असतात. पेशंट आल्यास त्यांना न तपासता मोबाईल वरुन उपचार पध्दती सांगुन उपचार केले जात आहे. याकडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किरण पाटील यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.