धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वामी समर्थ केंद्राच्या मागच्या बाजूला अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याचे क्रांक्रीटीकरण झाल्यामुळे रस्त्याचे रुप पालटलेले आहे. त्यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांची वाट सुकर झाली आहे.
कित्येक वर्षे धुळखात पडलेला, धुळ उडवणारा आणि पावसाळ्यात चिखलाने बरबटलेल्या या रस्त्याचे क्रांक्रीटीकरण झालेले आहे. या रस्त्यावरून रेल्वे स्टेशनवर, कॉलनी परिसरात आणि मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांसाठी रस्ता सोयीचा झाला आहे.
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने व शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या दूरदृष्टीने रस्त्याचे क्रांक्रीटीकरण करण्यात आले आहे. चिंतामणी मोरया परिसरात माजी पालकमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज तलावाचे खोलीकरण करून रस्त्याचे मुरुमीकरण केले होते. या रस्त्याचे क्रांक्रीटीकरण करण्याची दूरदृष्टी गुलाब वाघ यांना आली आज परिसरात क्रांक्रीटचे रस्ते झाले आहेत.