पारोळा येथील एनइएस हायस्कूलमधील संगणक चोरांना अटक

crime bedya

पारोळा, प्रतिनिधी | येथील एनइएस हायस्कूलमधून डिसेंबर महिन्यात संगणक व प्रिंटरची चोरी झाली होती. याचोरी प्रकरणात पारोळा पोलिसांनी आज दोघा अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एनइएस हायस्कूल मधून २८ डिसेंबर दुपारी २.०० वा. ते ३० डिसेंबर २०१९ च्या सकाळी ६.४५ वा. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शाळेचा कडी-कोंडा कुलुप तोडुन संगणक, प्रिंटर,सीपीयू असे ४२ हजार ६०० रुपये किंमतीचे शालेय साहित्य चोरुन नेले होते. याबाबत मुख्याध्यापक प्रदीप सोणजे यांनी पारोळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्याअनुषंगाने पारोळा पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पो.कॉ. पंकज राठोड, सुनिल साळुंखे, किशोर भोई यांना दि. १० जानेवारी रोजी गुप्त बातमीदाराकडुन पारोळा शहरातील नाट्या व शिवा यांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. यामाहितीनुसार आज शनिवार ११ जानेवारी रोजी पारोळा शहरातील धरणगाव चौफुली येथे नाट्या उभा असल्याचे समजले म्हणून त्या ठिकाणी जावुन त्यास ताब्यात घेतले असून त्याचा मित्र शिवा हा देखील त्याच परिसरात असल्याने त्याला ही ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यातील मुद्देमाल काढून दिला आहे. तरी पुढील तपासाकरता त्यांना तपास अधिकारी पोहेकॉ. किशोर पाटील यांचे ताब्यात दिले आहे. पारोळा पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पो.काँ. पंकज राठोड, सुनिल साळुंखे, किशोर भोई हे या अल्पवयीन आरोपीकडुन अजुन काही गुन्हे उघडकीस केले आहे काय याबाबत विश्वासात घेवुन विचारपूस करत आहे.

Protected Content