सरसकट कर्जमाफी करा : राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी नगरपालिका आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यावल तालुक्यातील आढावा बैठक पार पडली. जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे व पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

यावल तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या सभागृहात आयोजित या बैठकीत पक्षाच्या संघटन वाढीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांनुसार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली. सरकारने त्वरित कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाभर आंदोलन छेडेल, असा इशारा त्यांनी दिला.

याप्रसंगी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले. या बैठकीत जिल्हा निरीक्षक भास्करराव काळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, जिल्हा सरचिटणीस विजय पाटील, आदिवासी सेलचे एम. बी. तडवी, यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनीही आपले विचार मांडले.

बैठकीला राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष पवन पाटील, फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, तालुका उपाध्यक्ष ललित पाटील, माजी उपनगराध्यक्ष अकबर खाटीक, नानाजी पाटील, यावल शहराध्यक्ष अन्सार खान, सईद भाई, मोहराळा विका चेअरमन किरण पाटील, युवक तालुका सरचिटणीस मयूर पाटील, सामा न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, यावल शहराध्यक्ष कामराज घारू यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मुकेश येवले यांनी केले तर आभार प्रदर्शन पवन पाटील यांनी मानले.

Protected Content