यावल येथे आदिवासी दिनी आदिवासी बांधवांनी मांडल्या तक्रारी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिवस आदिवासी बांधवांच्या विविध पारंपारीक सांस्कृतीक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणा साजरा करण्यात आले. याच कार्यक्रमात आदिवासी बांधवांनी विविध तक्रारींचा पाढा उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत कुमार यांच्यापुढे वाचाला.

 

यावल येथे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या आवारात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत कुमार हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणुन रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी , प्रकल्प अधिकारी अरूण पवार ,भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे ,भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी ,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, आदिवासी तडवी,भिल एकता संघटनेचे प्रदेश अध्यक्ष एम बी तडवी ,पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील ,तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड,जेष्ठ समाजसेवक मुनाफ तडवी,दिलरूबाब तडवी,परसाडे सरपंच मिना राजु तडवी यांच्यासह आदिवासी चळवळीतील विविध संघटनाचे प्रमुख पदाधिकारी यादी या कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित होते.

 

यावेळी आदिवासी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे जेष्ठ समाजसेवक एम बी तडवी सर , दिलरूबाब तडवी, मुनाफ जुम्मा तडवी यांनी शासन प्रशासनाच्या माध्यमातुन खऱ्या आदिवासींना डावलुन वनहक्क व आदी योजना विषयी माहिती देतांना मध्यप्रदेशातील परप्रांतीय नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ दिले जात असल्याच्या तक्रारी आपले विचार मांडतांना व्यक्त केल्यात, दरम्यान या जागतिक आदिवासी दिना निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील विविध आश्रमशाळेतील विद्यार्थींनी यांनी पारंपारिक आदिवासी लोकगीतांवर सुन्दर नृत्य सादर केलीत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले. यशस्वीरित्या पार पडलेल्या या कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील त्यांच्या सर्व प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी महत्वाचे परिश्रम घेतले .

Protected Content