Home क्राईम राज ठाकरेंविरुद्ध चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार

राज ठाकरेंविरुद्ध चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार


mns chief raj thackeray gets bail in 2008 case 2018 12 19

मुंबई (प्रतिनिधी) देशातली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी येत्या एक-दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला पुन्हा एकदा घडवला जाईल, असे भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिनानिमित्त आयोजित सभेत बोलताना केले होते. याच वक्तव्यावर आक्षेप घेत, जेष्ठ पत्रकार आणि वकील एस. बाल. कृष्णन यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

देशातली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी येत्या एक-दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला पुन्हा एकदा घडवला जाईल, असे भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे वर्धापन दिनानिमित्त केले होते. याच वक्तव्यावर आक्षेप घेत एस. बाल. कृष्णन यांनी पोलिसात तक्रार केली आहे. पोलिसांनी राज ठाकरेंच्या विरोधात कारवाई केली नाही तर कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा एस. बाल. कृष्णन यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी या अगोदर कोल्हापूर येथील सभेत देखील असेच वक्तव्य केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा घडवला जाऊ शकतो असे भाकीत त्यांनी केले आहे. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर पोलिसांनी अथवा गुप्तचर यंत्रणांनी त्याची कोणतीही चौकशी केली नाही. म्हणून एस बालकृष्णन यांनी रविवारी या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound