Home राज्य विंग कमांडर वर्धमान यांची माहिती जाहीर केल्याबद्दल पोलिसात तक्रार

विंग कमांडर वर्धमान यांची माहिती जाहीर केल्याबद्दल पोलिसात तक्रार


52987157 2067567613296632 4432466190035582976 n

सोलापूर (प्रतिनिधी) काही वृत्तवाहिन्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या घरी जाऊन, तिथले चित्रण दाखवून, त्यांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात आणला असल्याची तक्रार येथील जागृत नागरिक तथा प्रसिद्ध लेखक समीर गायकवाड यांनी तामिळनाडू पोलिसांकडे आज (गुरुवार) दाखल केली आहे.

 

या तक्रारीच्या फॉलोअपसाठीचा एक ई-मेल तिथले विरोधी पक्षनेते डीएमकेचे एम. के. स्टालिन यांनाही श्री. गायकवाड यांनी केला आहे. कारण सत्तारूढ एआयएडीएमके या मुद्द्यावर कार्यवाही करावी हे अपेक्षित आहे. पण तसे न झाल्यास त्याबद्दल विरोधकांनी फॉलोअप घेणे गरजेचे आहे. एका व्यक्तीने विकीबायोवरती अभिनंदन वर्धमान यांच्या नावाचे पेज सुरु करून त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो आणि पत्ता दिला आहे. विकीबायोकडे ते पेज डिलीट करण्यासाठीही अपील करण्यात आले आहे. यासंदर्भात आपणास तक्रार करणे शक्य असल्यास आपणही विकीबायोच्या पेजमधील कंटेंट वगळले जाण्याची मागणी करू शकतात, असेही श्री. गायकवाड यांनी म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound