चोपडा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सुटकार येथील ग्रामसेवक जयवंत पाटील यांनी महात्मा गांधी व महर्षी वाल्मिकी यांची जयंती ग्रामपंचायत येथे साजरी न केल्याने त्यांचावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
ग्रामसेवक जयवंत पाटील हे शासनाचा कोणतीही योजनेची अंमलबजावणी करत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ शशिकांत ठाकरे यांनी गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारद्वारे केली आहे. तक्रारीचा आशय असा की, ग्रामसेवक जयवंत पाटील हे कोणतेही शासन निर्णय ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना देत नाहीत. यासोबत ते या शासन निर्णयांची अंमलबजावणी देखील करत नाहीत. यानुसार त्यांनी शासन निर्णयानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी साजरी करणे आवश्यक होते. मात्र, ते २ ऑक्टोबर रोजी ते गैरहजर राहिल्याने गांधी जयंती साजरी करता आली नाही. यातून त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास येत आहे. तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान,ग्रामसेवक जयवंत पाटील यांनी शासनाचे परिपत्रक असतांना देखील महर्षी वाल्मिकी यांची जयंती देखील साजरी केलेली नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य विजय बाविस्कर यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलतांना सांगितले असून त्यांनी ग्रामसेवक जयवंत पाटील यांच्यावर निष्क्रियतेचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.