


धरणगाव प्रतिनिधी । भारतीय स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या धरणगाव शाखेतील एका खातेदाराच्या खात्यातून कोणतीही पुर्वसुचना न देता खात्यातून सहा हजार रूपये काढल्याचा व्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून ते पैसे खात्यात परत मिळावे यासाठी शाखा प्रबंधक यांना तक्राराचे निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडीयाची धरणगाव शाखेत ग्राहक दिलीप भगवान चव्हाण रा. धानोरा ता. धरणगाव यांचे गेल्या आठ वर्षापासून बचत खाते आहे. खात्यातील व्यवहार किंवा एटीएम मशीनचा कोणताही व्यवहार न केल्याने दिलीप चव्हाण यांच्या खात्यातून सहा हजार रूपये काढल्याचा व्यवहार करण्यात आला. बँकेच्या ताब्यात असतांना इतर कोणी सहा हजार रूपये कसे काढू शकतात याबाबत शाखा प्रबंधक यांना तक्रार करून पैसे खात्यात परत देण्याची मागणी केली आहे.


