जळगाव प्रतिनिधी । शहरातील नवीपेठेतील हस्ती सुगंध कंपनीने ट्रेड मार्क कंपनीचा लोगो वापरून नाशिक येथील कंपनीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील नवीपेठेतील गणेश बिल्डिंगच्या मागे असलेल्या मे. हस्ती सुगंधी दुकानदाराने नाशिक येथील हकिकुल्लाह हाफीज उल्लाह खान (वय-३३) रा. नाशिक यांच्या मालकीचे रिलॅक्सो डोमेश्वर नाशिक या कंपनीच्या नावाचा ट्रेड मार्कचा अनधिकृत वापर करून अगरबत्ती विक्री करत असल्याचा प्रकार उघडकीला आला. हा प्रकार ८ सप्टेंबर २०१९ पासून ते २७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सुरू होता. याबाबत नाशिक येथील हकिकुल्लाह हाफीज उल्लाह खान यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी २७ नोव्हेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अमिशा नयन शाह, नयम दिनेशकुमार शाह आणि मे. हस्ती सुगंधिचे मालक (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोरे करीत आहे.