यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोविड लसीकरणास उपकेंद्र स्तरावर दहिगाव व सातोद येथे आज पासुन प्रारंभ करण्यात आला आहे. शिबिरास ग्रामीण क्षेत्रातील १८ वर्षावरील युवक-युवतींचा व नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
तालुक्यात नागरिकांना गावपातळीवरच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम कार्यक्षेत्रातील उपकेंद्र दहिगाव व सातोद येथे १८ वर्षावरील कोविड लसिकरण शिबिराचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
लसीकरण मोहीमचे शुभारंभ या वेळी दहिगाव येथे सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच किशोर महाजन , सुरेशआबा पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खालिद शेख आरोग्यव पर्यवेक्षिका शोभा चौधरी, राजेंद्र बारी, अरविंद जाधव, ग्रामविकास अधिकारी योगेंद्र अहिरे, मुख्याध्यापक शालिक चौधरी व आरोग्य सेविका अनिता महाजन तर सातोद येथे सरपंच जाईबाई भिल, उपसरपंच ललित पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी, डॉ. राहुल गजरे, आरोग्य सेवक भुषण पाटील, आरोग्य सेविका प्रतिभा चौधरी, गट प्रवर्तक हिमांगी फेगडे व समीर तडवी आदी उपस्थित होते.
शिबिरात १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील दहिगाव येथे १०० तर सातोद येथे १८० व सावखेडासिम येथे ८० असे ३६० नागरिकांना कोविशील्ड लस देण्यात आली. यावेळी दुसऱ्या डोस ला पात्र नागरिकांनाही दुसरा डोस देण्यात आला. दहिगाव येथील ग्राम पंचायत सदस्य माजी उपसरपंच देवीदास नाना पाटील उपस्थित होते . स्पॉट रजिस्ट्रेशन अरविंद जाधव, भूषण पाटील व बालाजी कोरडे यांनी केले.
लसीकरण झाल्यावर आपल्याला एक मेसेज प्राप्त होईल सोबत लिंक असेल त्या लिंक वरून आपले लसीकरणाचे प्रमाणपत्र डाऊनलोड करून ते जतन करून ठेवावे. असे डॉ. नसीमा तडवी यांनी लसीकरण मोहीमेत सहभागी नागरीकांना सांगितले. तर लस घेतल्यानंतर देखील नागरिकांनी नियमित मास वापरावा. व सामाजिक अंतर ठेवावे असे आव्हान डॉ. गौरव भोईटे यांनी केले.
शिबिरास आशा सेविका नीता महाजन, अर्चना अडकमोल, भाग्यश्री महाजन, पुष्पा पाटील, संध्या बाविस्कर, शोभा कोळी, रूपाली येवले, सुरेखा गणूरकर व चंद्रकला चौधरी तसेच आदर्श विद्यालय दहीगाव चे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, स्टॉप व ग्रामपंचायत यांचे सहकार्य लाभले.