किनगाव बुद्रुक येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाला सुरुवात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातीत किनगाव बुद्रूक ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्तआयोगातून गावातील बाजीराव नगर येथील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला ९ लाख ६७ हजार रुपये खर्चातून सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी माजी आमदार रमेश चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास पाटील (आर.जी.नाना ) यांच्या प्रयत्नातुन किनगाव खुर्द आणी किनगाव बुद्रुक या दोन्ही गावातील विविध विकासकामे करण्यात आलीत अशा जिल्हा परिषदच्या सदस्या अरूणामाई पाटील, यावल पंचायत समिती सदस्य तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत पाटील, किनगाव बुद्रुकच्या सरपंच यांचे पती संजय पाटील, माजी सरपंच व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन टीकाराम चौधरी, किनगाव बुद्रुक ग्राम पंचायतचे सदस्य विजय वारे, राजेंन्द्र पाटील, किरण सोनवणे, संजय वराडे, सबदर तडवी, आनंदा महाजन किनगाव खुर्दचे सरपंच भुषण पाटील, पत्रकार आर ई पाटील यांच्यासह किनगावची ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येत उपस्थीत होते.

 

Protected Content