जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेत डिप्लोमा इन जर्नालिझम् ,एम.ए.एम.सी.जे. (जनसंवाद आणि पत्रकारिता) या अभ्यासक्रमांसह डिजिटल आणि सोशल मीडिया, कॅमेरा हॅन्डलिंग, व्हिडिओ एडिटींग, रेडिओ जॉकी, रायटींग फॉर न्यूजपेपर, न्यूजपेपर पेजिनेशन, जनसंपर्क या सात तीन महिन्यांच्या कौशल्यआधारित व रोजगारभिमुख अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
डिप्लोमा इन जर्नालिझम् हा बारावी नंतरचा एक वर्षीय अभ्यासक्रम असून प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावीत किमान 40 टक्क्यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पदवी (ऐनी ग्रॅज्युएशन) नंतर एम.ए.एम.सी.जे. (जनसंवाद आणि पत्रकारिता) हा दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. याशिवाय डिजिटल आणि सोशल मीडिया, कॅमेरा हॅन्डलिंग, व्हिडिओ एडिटींग, रेडिओ जॉकी, रायटींग फॉर न्यूजपेपर, न्यूजपेपर पेजिनेशन, जनसंपर्क या सात प्रमाणपत्र अभ्यासक्रमांची ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशाकरिता बारावी किमान 40 टक्यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.हे अभ्यासक्रम तीन महिन्याच्या मुदतीचे असून या प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या फक्त रविवारी दोन सत्रात तासिका होणार आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, उद्योग सांभाळून हे अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहेत. वरील अभ्यासक्रम पूर्णत: रोजगारभिमुख असून यशस्वी विद्यार्थ्याना वृत्तपत्रे, रेडिओ, वृत्तवाहिन्या, ऑनलाईन पत्रकारिता, सोशल मिडिया, जाहिरात संस्था आदी ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी, संवाद तज्ज्ञ, सोशल मिडिया हँडलर म्हणून कार्य करण्याची देखील संधी उपलब्ध आहे.
एम.ए.एमसीजे व डिप्लोमा इन जर्नालिझम् या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरीता विद्यार्थ्यानी विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळास भेट देवून https://nmuj.digitaluniversity.ac या ऑनलाईन ऍडमिशन लिंकला क्लिक करून प्रवेशासंबंधी अर्ज करणे आवश्यक आहे. तरी इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रवेशासंबंधीच्या अधिक माहितीसाठी माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर (8407922404), डॉ.गोपी सोरडे (9834166072) अथवा प्रशाळेत कार्यालयीन वेळेत 0257-2257436, 2257438 या क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन माध्यमशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर यांनी केले आहे.