जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या कृती गट व संघटनेकडून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन व राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने आज मंगळवार, दि.२० सप्टेंबर रोजी आश्वासित प्रगती योजना सुरु करणे, विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा उर्वरित पदांचा सातवा वेतन आयोगाचा जीआर निर्गमित करणे आदी मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी शरद पाटील, भैय्या पाटील व सुरेश चव्हाण यांनी हे निवेदन दिले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यापीठ कर्मचाऱ्यांना ‘मुंबईला या; चर्चा करुन निर्णय घेऊ.’ असे आश्वासन दिले. यावेळी ना. गुलाबराव पाटील व ना. गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडे विद्यापीठ कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरली. नामदार गुलाबराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून ही भेट घडल्याने कर्मचारी संघटनेकडून त्यांचे आभार मानण्यात आले.
निवेदन देतांना कृती समिती उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, कर्मचारी संघटनेचे अजमल जाधव, आर.डी.पाटील, संजय सपकाळे, अशोक पाटील, आर.एम.पाटील, विलास बावीस्कर, सुरेखा पाटील, प्रतिभा पाटील, निता शिंदे, राजू सोनवणे, अमृत दाभाडे, भीमराव तायडे, जगदीश सुरळकर, पुरुषोत्तम कदम, शांताराम पाटील, वानखेडे, शैलेश पाटील, दशरथ बोरसे, संजय शिरोडे, विठ्ठल पाटील, प्रवीण चंदनकर, सुनील निकम, चंदन मोरे आदी उपस्थित होते.