भुसावळात आ. सावकारे यांचा उद्या प्रचाराचा नारळ फुटणार

sanjay savkare

भुसावळ  प्रतिनिधी । भुसावळ विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई रासप व शिवसंग्राम महायुतीचे अधिकृत उमेदवार आ.संजय सावकारे यांच्या प्रचार कार्याचा शुभारंभ उद्या दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयापासून सुरुवात करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खा.रक्षा खडसे यांच्याहस्ते नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी प्रा.डॉ. सुनिल नेवे, नगरध्यक्ष रमण भोळे, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे, प.स सभापती प्रिती पाटिल, भाजपा तालुका अध्यक्ष सुधाकर जावळे, शहरध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, शिवसेना ता.प्रमुख समाधान महाजन, शहर प्रमुख बबलु ब-हाटे, नगर पालिकेचे गट नेते मुन्ना तेली, उप नगरअध्यक्ष शेख सहिदा शेख शफी, शैलजा पाटिल, पूनम ब-हाटे, रविंद्र सुतार, शहर अध्यक्ष मीना लोणारी, विधानसभा अध्यक्ष वसंत पाटिल, दिनेश नेमाडे व सर्व महायुतीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थितीत राहणार आहे.

Protected Content