भडगाव प्रतिनिधी । येथील शासकीय आयटीआय कोवीड केअर सेंटर व ग्रामीण रूग्णलयात भेट घेवून कोरोना रूग्णांची आमदार किशोर पाटील यांनी केली. त्यांच्या अडचणी समजून घेवून संबंधित यंत्रणेला तशा सुचना दिल्यात. आमदारांच्या भेटीने रूग्णाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
आज २१ मार्च रोजी आमदार किशोर पाटील यांनी कोरोना बाधित रूग्णांची भेट घेतली. काही रूग्ण हे ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आहेत. त्याच्यांवर तेथे उपचार सुरू आहेत. तर काही रूग्ण हे शासकीय आयटीआयमधील स्थापन करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मधे क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी दोघे ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष रूग्णाशी संवाद साधला. त्यांना धीर देत अस्थेवाईक चौकशी केली. त्याच्यां समस्या जाणून घेतल्या. जेवण, नास्ता वेळेवर मिळत आहे की, नाही याची विचारणा केली. त्याबाबत प्रशासनाला सुचना दिल्या. याशिवाय प्रशासनाच्या ही त्यांनी अडचणी समजुन घेतल्या. यावेळी प्रातांधिकारी राजेंद्र कचरे, नायब तहसिलदार आर. बी. देवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव, डॉ. प्रतिक भोसले टोणगाव तलाठी राहुल पवार आदि उपस्थित होते.