जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विकास कामांसाठी आमदार राजूमामा भोळे नेहमीच प्रयत्नशील असतात. शहरातील दलित वस्तीतील रस्ते व्हावी अशी मागणी होती. या अनुषंगाने आमदार राजूमामा भोळे यांनी केलेल्या मागणीवरून दलित वस्तीतील रस्त्यांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रस्त्यांची कामे मार्गी लागणे अत्यंत महत्वाचे आहे. राज्यात भाजपा शिवसेना जनतेच्या मनातील सरकार आल्यापासून शहराच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत भरीव निधी देण्यात आलेला आहे. त्यापैकी अनेक रस्त्यांची कामे सुरु आहेत. शहराच्या सर्वांगिन विकासासाठी आमदार राजुमामा भोळे नेहमी प्रयत्नशील असून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. शहराच्या विकासात भर पडण्यासाठी आज पुन्हा आमदार सुरेश दामु भोळे (राजुमामा) यांच्या मागणीवरून जळगाव शहरातील दलित वस्तीतील रस्त्यांच्या विकासकामांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
निधी मंजूर होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. जळगाव शहरास शिंदे व फडणवीस सरकार आल्यापासून भरीव निधी दिल्याबद्दल जळगाव शहर वासीयांच्या वतीने आ. राजुमामा भोळे यांनी आभार मानले आहे.