आ. राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांची घेतली भेट

अंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण आंदोलन सुरू केले आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री राजेश टोपे हे दाखल झाले आहे.

अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. विशेष म्हणजे आज राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापनदिन असून या कार्यक्रमापूर्वी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे अंतरवाली सराटीत दाखल होऊन त्यांनी मनोज जरांगेंशी चर्चा केली आहे. त्यामुळे या भेटीला काहीसे महत्व प्राप्त झाले आहे.

Protected Content