आ. खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त येथे १ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे  आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त व आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या अभियाना अंतर्गत दिनांक ०१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.

 

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा  ऍड. रोहिणीताई खडसे- खेवलकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, तसेच   उपाध्यक्ष नारायण दादा चौधरी आणि सचिव डॉ. सी. एस. चौधरी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

 

या रक्तदान शिबिरात मुक्ताईनगर तालुक्यातील व पंचक्रोशीतील तमाम आजी व माजी विद्यार्थ्यांनी,  एनएसएस स्वयंसेवक आणि नागरिकांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेऊन ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ आहे. हे ब्रीदवाक्य  ऊराशी बाळगून आपण प्रत्येकांनी सामाजिक  बांधिलकी या नात्याने कुटुंबात, समाजात व गावागावात पोहोचवावे, तसेच ज्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना रक्तदान शिबिरामध्ये भाग घ्यावयाचा असेल त्यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांनी केले आहे.

 

 

रक्तदान शिबिराचे  मार्गदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील,  उपप्राचार्य डॉ राजेंद्र चौधरी, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजीव साळवे, प्रा. डॉ .प्रतिभा ढाके व ग्रंथालय अधीक्षक प्रा. सरोदे यांनी केले आहे. या शिबिराचे संयोजन रेड  प्लस सोसायटी जळगाव व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. ताहिरा मिर, प्रा. डॉ. दीपक बावस्कर व प्रा. विजय डांगे (८४२१७०९८९९) यांनी केलेले आहे.

Protected Content