पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा व भडगाव ग्रामीण रूग्नालयांना उपजिल्हा रूग्नालयाचा दर्जा मिळावा, अशी मागणी आमदार किशोर पाटील पाटील शासनाकडे केली आहे. त्या अनुषंगाने आज मंत्रालयात राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची व लोकप्रतिनिधीची एक बैठक झाली. मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असुन त्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आमदार किशोर पाटील यांना सांगितले आहे.
पाचोरा व भडगाव येथे सध्या ग्रामीण रूग्नालय कार्यरत आहे. दोघा तालुक्याचा आरोग्याचा व्याप व जळगावचे अंतर पाहता पाचोरा व भडगाव येथील ग्रामीण रूग्नालयांना उपजिल्हा रूग्नालयाचा दर्जा द्यावा, अशी मागणी आ. किशोर पाटील यांनी शासन दरबारी लावून धरली आहे. पाचोरा येथे ग्रामीण रूग्नालयाच्या नविन इमारतीला प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी आमदारांनी केली आहे. या नविन इमारतीसाठी 14 कोटी 35 लाख खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात मंत्रालयात आज राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. पाटील यांनी मागणी बाबत सविस्तर भुमिका मांडली. यावर मंत्री शिंदे यांनी उपस्थिती अधिकार्याना यासंदर्भात तत्काळ अहवाल देण्याबाबत सुचना केल्या. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य सचिव प्रदिप व्यास, सहसचिव श्री. ठोंबरे, नाशिक आरोग्य उपसंचालक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापुरकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एच.चव्हाण , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.