आ. किशोर पाटलांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कामांसाठी १६ कोटीचा निधी मंजूर

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा – भडगाव विधानसभा अंतर्गत येणाऱ्या विविध रस्त्यांच्या कामासाठी आमदार किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती आ. पाटीलांनी दिली आहे.

या सर्व रस्त्यांची मागणी स्थानिक जनतेने लावून धरली होती. त्याची दखल घेत आमदार किशोर पाटील यांनी शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या रस्ते कामात पाचोरा तालुक्यातील सामनेर ते दहिगाव दरम्यान सुमारे साडेचार किलोमीटरच्या रस्ता दुरुस्तीसाठी अडीच कोटी रुपये, सारोळा ते मोंढाळा दरम्यान असलेल्या सुमारे चार किलो मीटर रस्त्यासाठी अडीच कोटी, चिंचखेडा ते गाळण दरम्यान असलेल्या सुमारे दोन किलोमीटर रस्त्यासाठी एक कोटी रुपये, लासगाव ते बांबरुड (राणीचे) दरम्यान चार किलोमीटर रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये तर भडगाव तालुक्यातील आर्वी शिरूड – पळासखेडे – भडगाव दरम्यान सुमारे नऊ किलोमीटर रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये भडगाव वलवाडी रस्ता सुधारणेकामी अडीच कोटी रुपये, कजगाव ते पारोळा रस्ता सुधारणा करणे अडीच कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे.

दरम्यान या कामांच्या मंजुरीबद्दल आ. किशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

 

Protected Content