Home Cities जळगाव आ. हरिभाऊ जावळे यांची महाराष्ट्र कृषी परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्‍ती

आ. हरिभाऊ जावळे यांची महाराष्ट्र कृषी परिषदेच्या उपाध्यक्षपदी नियुक्‍ती


फैजपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील कलम १२(२)(व) मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर रावेर-यावलचे आमदार हरीभाऊ माधव जावळे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे.

 

या संदर्भात आज महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, हरीभाऊ जावळे यांची महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावरील ही नियुक्ती सदर नियुक्तीच्या दिनांकापासून ३ वर्षासाठी किंवा राज्यशासनाची मर्जी असेल तोपर्यत असेल. या आदेशाची प्रत उपसचिव महाराष्ट्र शासन सु.सं.धपाटे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेली आहे.


Protected Content

Play sound