सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावद्यातील आ.गं. हायस्कूलमध्ये शैक्षणिक सप्ताह दिनांक 22 जुलैपासून सुरू आहे. या सप्ताहामध्ये विविध उपक्रम राबविले जात आहे. याच दरम्यान आ.गं. हायस्कूल सावदा येथे इको क्लबची स्थापना शासनाने दिलेल्या निर्देशानुसार करण्यात आली. या इको क्लबच्या अध्यक्षपदी विद्यार्थ्यांमधुन मनीष श्रीकांत वाणी या बारावी शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळेला श्री सतीश घनश्याम बेंडाळे माजी नगरसेवक हे सुद्धा स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी उपस्थित होते. सतीश बेंडाळे यांनी त्यांच्या मुलीच्या लग्न पित्यर्थ मनामध्ये वृक्षारोपण व संवर्धन संकल्प घेतला होता. मुलीच्या कन्यादान प्रित्यर्थ १० वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन करील या त्यांच्या इच्छेस आ. गं. हायस्कूल सावदा या ठिकाणी मूर्त स्वरूप प्राप्त झाले. विद्यालयाचे प्राचार्य पी.जी. भालेराव यांनी या इको क्लबच्या वृक्षारोपण समारंभामध्ये सतीश बेंडाळे यांना पाचारण करून त्यांच्याकडून रोपे व पिंजरे शाळेला उपलब्ध झाली. वृक्ष देऊनच या माता पालकांचे सभेमध्ये स्वागत करण्यात आले .उपस्थित सर्व माता-पालक व विद्यार्थी यांनी हे वृक्षारोपण अतिशय उत्साहात संपन्न केले. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य पी.जी.भालेराव पर्यवेक्षक जे.व्ही. तायडे सर्व व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व सर्व विद्यार्थी व इको क्लबचे सदस्य उपस्थित होते.