मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी मंत्री आ .एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या बांधकामाबाबत असणार्या समस्या, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, नर्सेस,रुग्णवाहिका, रुग्णवाहिका चालक, स्वच्छताकर्मी यांच्या रिक्त पदांबाबत आणि त्यांना असलेल्या असणार्या समस्या जाणून घेण्यासाठी व यांच्या बाबतीत असणारे प्रश्न विधिमंडळ सभागृहात मांडण्यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या यात प्रामुख्याने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात यापुर्वी महिलांचे गर्भ पिशवी संबंधित विकार,गाठी, हर्निया, या बाबतच्या शस्त्रक्रिया करण्यात येत होत्या सर्पदंश / विषप्राशन केलेल्या रुग्णांवर उपचार होत होते परंतु आता रुग्णालयात सर्जन आणि एमडी मेडिसिन डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे हे उपचार बंद आहेत त्यामुळे या आजारांच्या रुग्णांना प्रत्येक वेळी जळगाव येथे जावे लागते.
काही प्रसंगी जळगाव येथे पोहचण्यासाठी उशीर झाल्यामुळे रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. याअगदोर ऑन कॉल वर वैद्यकीय अधिकारी बोलावण्याची शासनाची जी सुविधा होती तीही आता बंद करण्यात आली आहे. महिला गर्भवती झाल्यापासून ते बाळंतपण होई पर्यँय तिला सुविधा देण्यासाठी १०२ नंबरची रुग्णवाहिका उपलब्ध होती तिच्या चालकाचा करार संपल्यामुळे रुग्णाला या सेवेचा लाभ मिळत नाही. यासोबतच सफाई कर्मचार्यांचा करार सुद्धा संपुष्टात आल्यामुळे व शासनाने त्याचा खर्च आर के एस मधून करण्यास नकार दिल्यामुळे सफाई कर्मचारी उपलब्ध नाहीत यामुळे रुग्णालयात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे या सर्व गोष्टींवर काहीतरी तोडगा काढावा अशी विनंती यावेळी उपस्थित अधिकार्यांनी एकनाथराव खडसे यांच्या कडे केली.
यासोबतच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सेस च्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यामुळे याअगोदर ग्रामीण भागात महिलांच्या होत असलेल्या प्रसूती पूर्णपणे बंद असल्याचे यावेळी निदर्शनास आले. आता जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते करारावर आहेत. त्यांचा करार संपल्यावर ते पद रिक्त होतील आधीच अनेक पदे रिक्त आहेत आहेत यावरतीही तोडगा काढण्याची विनंती उपस्थित अधिकार्यांनी केली.
बांधकामाच्या बाबतीत जी बांधकामे चालू आहेत ती सर्वच अपूर्ण अवस्थेत आहेत कोणतेच बांधकाम पूर्ण नसल्यामुळे ते वापरात आणता येत नाही त्यामुळे तातडीने एक-एक बांधकाम पूर्ण करण्याची त्यांनी विनंती केली. बोदवड येथील शवविच्छेदन रूम ची दुरव्यवस्था झाल्यामुळे व ती खोल भागात असल्यामुळे ती वापरात येत नाही त्यामुळे तिचे नव्याने बांधकाम/ दुरुस्ती करून तिथे भराव टाकण्यात यावा अशी विनंती बोदवड तयेथील वैदयकीय अधिकारी यांनी केली. अशा सर्व समस्या यावेळी उपस्थित वैदकीय अधिकारी व इतर अधिकारी यांनी आढावा बैठकीत आ एकनाथराव खडसे यांच्याकडे मांडल्या. याचे निराकरण करण्यात येणार असल्याचे आमदार खडसे म्हणाले.
यावेळी बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी म्हणून वैद्यकीय निवासी अधिकारी डॉ.आकाश चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रामिण रुग्णालय अधीक्षक डॉ योगेश राणे यांच्यासमवेतमुक्ताईनगर, बोदवड रावेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदकीय अधिकरी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, राष्ट्रीय आरोग्य मिशन चे अधिकारी, जिल्हा बँकेच्या माजी चेअरमन ऍड.रोहिणीताई खडसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष राजेंद्र माळी,बाजार समिती सभापती सुधिर तराळ, माजी सभापती निवृत्ती पाटील, विलास धायडे, रामदास पाटील,संदिप देशमुख,नगरसेवक मस्तान कुरेशी, बापू ससाणे, आमिन खान,युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे,प्रदिप साळुंखे, बाळा भालशंकर,निळकंठ महाजन,विनोद काटे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.