आ. चंद्रकांत पाटलांमुळे बोदवडच्या शेतकर्‍यांना मिळणार १७ कोटी ८३ लाखांचा पीक विमा !

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे बोदवड तालुक्यातील शेतकर्‍यांना तब्बल १७ कोटी ८३ लाख रूपयांचा पीक विमा मिळणार आहे.

मागील काळात शासनातर्फे एक रुपयांमध्ये पिक विमा काढण्यात आला होता. त्यातील खरीप हंगामाच्या पिकांसाठी पिक विमा काढण्यात आलेला होता. परंतु या विम्याची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये लवकर जमा व्हावी व त्यांना मिळावी यासाठी वेळोवेळी शासनाकडे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यामधील बोदवड तालुक्यातील १६१४ शेतकरी यांचे अर्ज प्राप्त होते. त्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसाना-पोटी एक रुपया मध्ये काढलेल्या विम्यासाठी शासनाकडून १७ कोटी ८३ लाख रक्कम मंजूर झालेली आहे.

प्राप्त झालेल्या अर्जानुसार १६१४ शेतकर्‍यांच्या १२९५९ हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ८३ लाख रक्कम मंजूर झालेली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात शासनाकडून विमा काढण्यात आला होता. त्यातील खरीप हंगामात प्रामुख्याने घेतली जाणारी पिके उडीद, कापूस, मका, मूंग, तूर, ज्वारी, गहू या पिकांच्या झालेल्या नुकसानासाठी शेतकर्‍यांना ही पीक विम्याची रक्कम मंजूर झालेले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात काढण्यात आलेल्या पिक विमा ज्या शेतकर्‍यांनी विमा काढला होता त्यांना या विम्याचा लाभ मिळणार आहे. व लवकरच त्याची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

शेतकरी मागील काही काळापासून अस्मानी संकटामुळे हैराण झालेले असताना त्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले होते. त्यासाठी शासनाने एक रुपयांमध्ये पिक विमा उपलब्ध करून दिला होता त्या अनुषंगाने राज्य शासनाने शेतकर्‍यांची दखल घेत तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी शासनाकडे केलेल्या पाठपुरामुळे शेतकर्‍यांना आता या पिक विम्याचा लाभ मिळणार आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Protected Content