फैजपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर (कॅबिनेट दर्जा) रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांची गुरुवारी राज्यशासनातर्फे नियुक्ती करण्यात आली. अध्यादेशाची प्रत सोशल मीडियावर धडकताच आमदार जावळे यांना संध्याकाळ पासूनच शुभेच्छा देण्यासाठी भालोद निवासस्थानी कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला आहे.
आमदार हरिभाऊ जावळे हे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे शिस्तबद्ध आमदार म्हणून यांची जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात ओळख आहे. पदासाठी आ. जावळे हे कधीही आग्रही नसत. आपल्याला पद मिळावे म्हणून त्यांनी कुणाकडे कधीही मागणी केली नाही. पण पक्ष जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली ती त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. गेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळेस हरीभाऊ जावळे यांची कृषीमंत्री पदावर वर्णी लागणार म्हणून मीडियावर चर्चा रंगू लागली होती. मात्र, आमदार जावळे यांनी त्यावेळी देखील सांगितले होते की, पक्षाने जर जबाबदारी सोपवली, तर मी पार पाडेल. तेव्हाही जावळे यांचे मंत्रिपद थोडक्यात हुकले होते.
आ. जावळे यांना शेती व शेतकऱ्यासंबंधी निगडीत असलेला विभाग कृषी विभाग आहे. या विभागाची त्यांना अतिशय मनापासून आवड आहे. त्याच विभागावर आ.जावळेंची निवड करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा प्राप्त झाल्याने त्यांना आनंद तर आहेच. मात्र शेतकऱ्यांच्या संशोधनासाठी त्या क्षेत्रात मला काम करण्याची संधी मिळाली. हे माझं सर्वात मोठं भाग्य असल्याचे आमदार हरिभाऊ जावळे यांनी सांगितले. आज सकाळपासूनच आमदार जावळे यांच्यावर कार्यकर्त्यांनीत्यांच्या भालोद निवासस्थानी शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे. कार्यकर्त्यांची भक्कम फळी पक्षात शिस्तप्रिय वागणूक ही त्यांची ओळख आहे. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, यावेळी जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, रावेर पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, भाजप तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, भाजयुमो तालुका अध्यक्ष लहू पाटील, पप्पू चौधरी, जयश्री चौधरी यासह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.