आ. अनिल पाटील यांची राष्ट्रवादी वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचे संघटन प्रभारी म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली असून, यासंदर्भातील पत्र 22 फेब्रुवारी 2025 रोजी आमदार अनिल पाटील यांना प्राप्त झाले आहे.

यापूर्वीही अनिल पाटील यांनी जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचे सदस्य नोंदणी प्रमुख म्हणून यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली होती. यंदा त्यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने पक्षातील राज्यस्तरीय नेत्यांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती. अखेर पक्षाने त्यांच्यावर प्रदेश पातळीवरील मोठी जबाबदारी सोपवत तीन जिल्ह्यांचे प्रभारीपद बहाल केले आहे. यामुळे त्यांची संघटनात्मक ताकद आणखी वाढली आहे.

या नियुक्तीबद्दल पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्यासह राज्य आणि जिल्हा पातळीवरील अनेक पदाधिकाऱ्यांनी अनिल पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content