खामगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | आ. आकाश फुंडकर यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याने गोंधळ उडाला असून याबाबत तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माझे व्टिटर अकाऊंट @advakash हे हॅक झाल्याचे मला समजले. त्याबाबत व्टिटरव्दारे देण्यात आलेल्या सुचना व लिंकला मी फॉलो करुन अकाऊंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते झाले नाही म्हणून मी सायबर सेल कडे देखील तक्रार दाखल करीत असून लवकरच हॅकर पकडल्या जाऊन त्याला दंड होऊन शिक्षा देखील होईल अशी माहिती खामगांवविधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
आज रोजी माझे व्टिटर अकाऊंट @advakash हे हॅक झालेले असून यावर येणाऱ्या कोणत्याही पोस्ट चा, त्यावर येणाऱ्या कोणत्याही माहितीचा माझा काहीही संबंध नाही. हे ट्विटर अकाऊंट आता RTFT या नावाने सुरू आहे. अकाऊंट आयडी माझाच आहे. कृपया यावर येणाऱ्या कोणत्याही पोस्टशी, माहितीशी अथवा कुणाच्याही बदनामीशी आणि इतर घडामोडींशी माझा काहीही संबंध नाही.
याबाबत मी सायबर सेल ला अधिकृत तक्रार दाखल करीत असून लवकरच हॅकर पकडला जाऊन दंड होऊन शिक्षा होईल. तोपर्यंत कुणीही या अकाऊंट वर येत असलेल्या पोस्ट्स लाईक करू नये. रिट्विट करू नये, लाईक करू नये अथवा कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये असे आवाहन आमदार आकाश फुंडकर यांनी एका प्रसिद्ध पत्रकार द्वारे केले आहे.