जळगाव प्रतिनिधी । शहरासह जिल्ह्यात काल रात्री ऑल आउट मिशनद्वारे कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी लावण्यात आली होती यात ३३५ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती आज अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.
याप्रसंगी पोलीस अधिक्षक शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात ऑल आऊट द्वारे कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी संपूर्ण जिल्ह्यात लावण्यात आली होती यात आवश्यक असलेले मनुष्यबळ पोलीस ठाण्यात व नियंत्रण कक्षात ठेवण्यात येऊन संपूर्ण पोलीस दल नाका-बंदी व कोम्बिंग ऑपरेशन साठी रस्त्यावर आले होते. यात स्वतः दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक दिवाळी पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी अधिवेशन रात्री दहा ते सकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होते. यात मोटर वाहन कायदा केसेस ४८२ केल्या त्यामध्ये ९५ हजार आठशे रुपये दंड वसूल करण्यात आला फरार आरोपी ३ पाहिजे असलेले आरोपी ३३, नॉन बेलेबल वॉरंट आरोपी, २१० बेलेबल वॉरंट आरोपी, ८९ हिस्ट्री सिटर, १३१ रेकॉर्ड वरील गुन्हेगार, १८१ टॅप टेन गुन्हेगार ८९ तपासले, दारू पिऊन वाहन चालविणे १२ अशा केसेस केल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
पहा– जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे नेमके काय म्हणालेत ते !