फैजपूर प्रतिनिधी । येथील धनाजी नाना महाविद्यालयात दि. 20 ऑगस्ट रोजी नॅक मुल्यांकन समितीचे चेअरमन कुलगुरु मोहम्मद रजिउद्दीन यांनी नॅक मुल्यांकन समितीचा अहवाल प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी सुपुर्द केला असुन आज समारोप प्रसंगी ते म्हणाले, दिवसेंदिवस हे महाविद्यालय प्रगतीपथावर कार्य करीत आहे. मला हे दोन दिवसात महाविद्यालयाचे मुल्यांकन करतांना जाणवले असून महाविद्यालयाने असेच उत्तरोत्तर प्रगती करत राहो.
याबाबत माहिती अशी की, महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अतिशय मेहनती असून महाविद्यालयाच्या विकासासाठी धडपडणारे आहेत. महाविद्यालयाचा परिसर अत्यंत सुंदर असून त्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त आहे. दिवसेंदिवस न थकता असेच सर्वांनी कार्य करीत रहावे, या महाविद्यालयातील प्रत्येक घटकाचे योगदान महाविद्यालयाच्या विकासासाठी मोलाचे आहे. महाविद्यालयाचे भविष्य उज्ज्वल आहे. कारण दिवसेंदिवस हे महाविद्यालय प्रगतीपथावर कार्य करीत असून हे दोन दिवस महाविद्यालयाचे मुल्यांकन करतांना जाणवले असेच उत्तरोत्तर प्रगती महाविद्यालयाने करत राहो. यासाठी महाविद्यालयातील सर्व घटकांना शुभेच्छा दिल्या तसेच मूल्यांकन समितीतील सदस्य डॉ. अरुण कुमार, डॉ.रवींद्र गुप्ता यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्राचार्य यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी सर्व सहकाऱ्यांनी किती मेहनत घेतली. याकडे समिती सदस्यांचे लक्ष वेधले, तसेच महाविद्यालयाच्या विकासासाठी आर्थिक बाबतीत तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष माजी आ.शिरिष चौधरी यांनी व नियामक मंडळातील सर्व पदाधिका-यांनी पूर्ण स्वातंत्र्य व परवानगी दिली. याबद्दल संस्थाचालकांचे आभार मानण्यात आले. नॅक समिती समन्वयक उपप्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी आपल्याला गेल्या दीड वर्षापासून कार्य करतांना मा.प्राचार्य यांचे मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्य ए.आय.भंगाळे, डॉ.आर.पी. महाजन, डॉ.डी.ए.कुमावत, डॉ.ए.के.पाटील, डॉ.एस.व्ही.जाधव, डॉ.नितिन चौधरी, प्रा.राजेंद्र राजपूत यांचे, प्रा.राकेश तळेले, प्रा.हरिष नेमाडे, प्रा.हरिष तळेले, प्रा.शिवाजी मगर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी तापी परिसर विद्यामंडळाचे अध्यक्ष मा.शिरीष चौधरी यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र राजपूत यांनी केले.