रावेर प्रतिनिधी । जिल्हात शासनाचे उद्दीष्ट पूर्ण झाल्याने मका खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. मात्र, बाकी असलेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी व्हावा यासाठी शासनाकडे प्रस्ताव देखिल पाठविला आहे. शक्य झाल्यास धान्य खरेदी व कापुस खरेदीला भेट देणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्युजला सांगितले.
रावेर तालुक्यात आता पर्यंत १२३ शेतक-यांची एक कोटी दोन लाख ३४ हजार २०० रूपयांचा ५ हजार ५३२ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे.तर ज्वारी व मका विक्री साठी ११७० शेतक-यांनी नंबर लावला होता.तब्बल ९६२ शेतकरी बाकी आहे.या संदर्भात लाईव्हने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी संपर्क केला यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पुढे म्हणाले की जिल्हात सर्वत्र शासनाचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे.यामुळे खरेदी केंद्र बंद आहे. शासनाकडे खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. शासना कडून मंजूरी मिळताच बाकी असलेल्या शेतक-यांचा मका खरेदी केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्हात ग्राम पंचायतीच्या निवडणुकांमुळे व्यस्थ शुडुल आहे. तरी सुध्दा शक्य झाल्यास या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात कापुस खरेदी केंद्र व ज्वारी व मका खरेदी केंद्राना भेट देणार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्युजला सांगितले.