जिल्हाधिकारी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये; गर्दीच्या विवाहांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पुन्हा एकदा थेट मैदानावर उतरत मंगल कार्यालये आणि लॉन्सवर कारवाई केली.

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. यासोबत नियमांचे उल्लंघन करून विवाह करणार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्वत: गर्दीच्या विवाहांवर कारवाई केली होती.

यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी आज पुन्हा थेट मैदानावर उतरून कारवाई केली. यात यश लॉन, दापोरेकर मंगल कार्यालय, मुक्तांगण हॉल, एमआयडीसीतील बालानी लॉन, श्रीकृष्ण लॉन्स, तडवी सभागृह या मंगल कार्यालयावर छापे टाकून वर- वधु पिता, आयोजक आणि जागा मालक यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनीयमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.

 

Protected Content