भगवान चौधरी यांच्या स्मरणार्थ निम गावाला शवपेटी भेट

90aa30e3 738c 4b0a b7c1 fe39a57cb62d

 

अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामीण भागात शिक्षणाची व्यवस्था करणारे मितभाषी व्यक्तिमत्त्व स्व. भगवान चौधरी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या धर्मपत्नी गं.भा.विमलबाई भगवान चौधरी यांनी निम गावाला शवपेटी भेट दिली आहे. या शवपेटीचा नुकताच लोकार्पण सोहळा पार पडला.

यावेळी ग.भा.विमलबाई चौधरी यांच्या हस्ते व कपिलेश्वर देवस्थानचे मठाधिपती स्वामी हंसानंद महाराज, निंब ग्रा.प.चे सरपंच भास्कर हिरामण चौधरी, वि.का.सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य अरुण लोटन पाटील, ज्ञानेश्वर ओंकार पाटील, नारायण कोळी, मधुकर रामदास चौधरी, डॉ.लादू दौलत चौधरी मंगल हिरामण पाटील,तुकाराम धोंडू चौधरी, सुभाष हिरामण चौधरी, लोटन नारायण पाटील,मगन वामन पाटील, दत्तात्रय सदाशिव पाटील, कैलास रामसिंग चौधरी आदी मान्यवर उपस्थितीत होते.

स्व.भगवान चौधरी यांनी आपल्या काळात निम गावात दहावीपर्यंत शाळेची व्यवस्था केली.त्यांच्या सारखे मोठे काम कोणतेही नाही. त्यारूपाने त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील, असे मान्यवरांनी सांगितले. यावेळी बळीराम रामकृष्ण चौधरी, ईश्वर भगवान चौधरी, मुख्याध्यापक अनिल भगवान चौधरी, सरकारी वकील अॅड.राजेंद्र भगवान चौधरी, नंदादीप माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content