
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी जामनेर येथे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दोन तासांचा अधिकृत दौरा निश्चित झाला असून, यावेळी ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन व शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत जिल्हा प्रशासनाला अधिकृत सूचना दिली आहे.


दरम्यान, भाजपच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी शनिवारी सकाळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, जयकुमार रावल आदी नेते जळगावात दाखल होणार आहेत. ही बैठक छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात होणार असून, सदस्यता नोंदणीचा आढावा यात घेतला जाणार आहे.
शनिवारी सकाळी १० वाजता महसूल मंत्री जळगावात दाखल होतील व दुपारी १ वाजता ते नाशिककडे रवाना होतील. मुख्यमंत्री फडणवीस रविवारी सकाळी जामनेरात दाखल होऊन कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार असून, त्यांच्या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.


