धरणगाव प्रतिनिधी । ज्ञानवंतांची आणि गुणवंतांची एकशे सहा वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलच्या सहा एनसीसी (भारतीय छात्र सेना) कॅडेट्सना मुख्यमंत्री स्कॉलरशीपचा सन्मान मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील ज्या सात कॅडेट्सना हा सन्मान आहे, त्यात पी.आर.हायस्कूलचेच सहा कॅडेट्स आहेत .हा सन्मान म्हणजे पी. आर. हायस्कूल आणि धरणगावच्या शिरपेचात खोवलेला मानाचा तुरा आहे.
कॅडेट प्रसाद नारायण चौटे, कॅडेट रोहित भटू माळी, कॅडेट अंकित अनिल महाजन, कॅडेट कृष्णा तुकाराम महाजन, कॅडेट रोशनी शिंदे आणि कॅडेट टिना शिवा नायर या सहा कॅडेट्सना हा सन्मान आज जाहीर झाला. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती वाढावी,भारतीय सैन्यदलात जाण्याचे आकर्षक वाढावे आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त,अनुशासन आणि नेतृत्वक्षमता येण्यासाठी भारत सरकारने शाळांमध्ये भारतीय छात्र सेना (एनसीसी) सुरू केली आहे. धरणगाव तालुक्यात फक्त पी. आर.हायस्कूल मध्येच एनसीसी बटालियन आहे आणि विशेष म्हणजे भारतातील मोजक्याच शाळांमध्ये मुलींसाठी एनसीसी आहे, त्यात पी.आर.हायस्कूल आहे.या विभागाची जबाबदारी मेजर डी. एस.पाटील हे सांभाळत आहेत.त्यांना एक्झुकेटीव्ह आॅफिसरचा (राजपत्रित अधिकारी) दर्जा आहे.यापूर्वी हा विभाग मेजर सी.ई.बाचपेयी सर हे सांभाळत होते.
एनसीसी कॅडेट्सच्या या यशाबद्दल पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरूण कुलकर्णी,उपाध्यक्ष वसंतराव गालापुरे सर,सचिव डॉ.मिलिंद डहाळे,संचालक अजय पगारीया, मुख्याध्यापक एस. एम. अमृतकर, उपमुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, पर्यवेक्षक आर.के.सपकाळे,प्राथमिक मुख्याध्यापक सौ. संगीता अहिरराव आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले आहे.