पंढरपूर । आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तांचा मळा फुलला असून आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक शासकीय पूजा करण्यात आली.
आज पहाटे पासूनच पंढरपुरात लक्षावधी वारकर्यांनी विठूरायाचे दर्शन घेण्यास प्रारंभ केला आहे. पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक शासकीय पूजा केली. याप्रसंगी राज्य सुजलाम-सुफलाम होऊ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रार्थना केली. तर यावर्षी आद्यपूजेचा मान अहमदनगर येथील चव्हाण दाम्पत्याला मिळाला.