Home Cities जळगाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्यात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्यात दाखल

0
47

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विविध विकासकामांच्या उदघाटनासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौर्‍यावर आले असून जळगावात आगमन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्ह्यात भोकर आणि पारोळा येथील कार्यक्रमांचा उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत खेडीभोकरी ते भोकर दरम्यानच्या तापी नदीवरील पुलाच्या भूमिपुजनासह अनेक विकासकामांचे भूमीपुजन आणि लोकार्पण होत आहे. यानंतर ते पारोळा येथील कार्यक्रमाला हजेरी लावणार असून तेथेही ते विकासकामांचे लोकार्पण करणार आहेत.

दरम्यान, आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हेही होते. जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी मुख्यमंत्री महोदय यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर ते भोकर येथे सुमारे रवाना झाले.


Protected Content

Play sound